‘भारत जोडो’ ही काँग्रेसची आणि एका अर्थाने राहुल गांधींची पदयात्रा आहे आणि या यात्रेचा उद्देश देशाला जोडणं आणि सर्वांनी एकत्र येऊन देश बळकट करणं हा आहे, पण...

या पदयात्रेने काँग्रेस समोरचे सर्व प्रश्न संपतील असे नाही. अशी पदयात्रा काढण्याची गरज वाटणे, लोकांशी संवादांची, त्यांचे सुखदुःख समजून घ्यायची गरज वाटणे, ही गोष्ट एक प्रकारे काँग्रेसची जनतेशी नाळ तुटली असल्याची, काँग्रेस जनतेपासून दुरावली असल्याची अप्रत्यक्ष कबुली आहे. या पदयात्रेने जनतेशी तुटलेला सुसंवाद पुन्हा सुरू होऊन जनतेपासून दुरावलेल्या काँग्रेसला पुन्हा जनतेच्या जवळ जाता येईल का?.......

‘भारतीय मुसलमान’ असे संबोधन करताना ‘भारताचे मुसलमान’ असा अर्थ अभिप्रेत आहे. भारतीय संविधान समजून घेऊन, त्यावर जे मुसलमान निष्ठा ठेवतात, ते भारताचे मुसलमान असतात

नुपूर शर्माच्या समर्थकांच्या हत्येचा जसा मी निषेध करतो, तितकाच तीव्र निषेध मी गोमांस बाळगल्याचा वा खाल्ल्याचा आरोप करून हिंदू गुंडांनी माझ्या मुस्लीम बांधवांच्या केलेल्या हत्यांचा करतो. भारतीय मुसलमानांना ते केवळ मुसलमान आहेत, म्हणून कोणी भगव्या कपड्यातील गुंड वेगळी वागणूक देतात, अशा प्रत्येक वेळी त्यांच्या बाजूने उभे राहणे संविधान निष्ठा असलेल्या प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, असे मी मानतो.......

भारताने काश्मीरचा ‘फुटीरतावादी’ चेहरा तेवढा पुढे आणला आणि काश्मिरींनी भारताच्या ‘जुलमी चेहऱ्या’चे दर्शन घडवले. पण सत्य कायमच या दोन चित्रांच्या मध्ये कुठे तरी अडकलेले राहिले आहे

‘वो जो गुलशन को लूटते ही रहे, साहब-ए-लाला ज़ार है अब तो... दिल को अम्न-ओ-अमाँ नसीब नहीं, खुशियाँ सारी फरार हैं अब तो...’ नामी नादरी नावाच्या शायराच्या या ओळी काश्मिरींच्या वर्तमानातल्या भावना पोहोचवण्यास पुरेशा आहेत. आजवर अनेकांनी, अनेक प्रकाराने काश्मीरचे चित्र रंगवले. त्यात भारताने काश्मीरचा फुटीरतावादी चेहरा तेवढा पुढे आणला आणि काश्मिरींनी भारताच्या जुलमी चेहऱ्याचे दर्शन घडवले. पण सत्य कायमच मध्ये कुठे तरी राहिले.......